अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगर २०२३-२४ कार्यकारिणी घोषित


दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगराची कार्यकारिणी दिनांक १३ सप्टेंबर रोजी डॉ मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सभागृह येथे घोषीत करण्यात आली.

या वेळी महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ यांनी छात्र गर्जना कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महानगर मंत्री ओम मालूंजकर यांनी वर्षभरात राबवीलेल्या कार्यक्रमांचा व विद्यार्थी समस्या निवारणासाठी केलेल्या कार्याचे मंत्रीप्रतिवेदन केले जाते. यानंतर महानगर अध्यक्ष प्रा. प्रदिप वाघ यांनी सन २०२२ – २३ ची जुनी कार्यकारिणी विसर्जीत करून सन २०२३ – २४ ची नवनिर्वाचित कार्यकारिणी घोषना‌ करण्यात आली. निर्वाचन अधिकारी विद्यार्थी परिषद पूर्व कार्यकर्ते विलास ठाकरे यांनी महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. प्रदीप वाघ व महानगर मंत्री म्हणून ओम मालुंजकर यांच्या नावाचे पुनर्निर्वाचन करण्यात आले.

पुढील घोषणा महानगर अध्यक्ष प्रा. प्रदिप वाघ यांनी केली. या वेळी कार्यकत्यांना विविध जवाबदार्या देण्यात आल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अॅड, अनिल ठोंबरे यांनी कार्यकत्यांना अगामी दिशा या विषयावर संबोधित केले. व वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • नाशिक महानगर कार्यकारणी २०२३-२४

महानगर अध्यक्ष – प्रा. प्रदीप बाळकृष्ण वाघ
महानगर मंत्री – ओम योगेश मालुंजकर
महानगर सहमंत्री – पूजा संदीप ताजनपुरे
महानगर सहमंत्री – नरेश नारायण सोनवणे
महानगर सहमंत्री – प्रगती जितेंद्र काळे
महानगर सहमंत्री – यश प्रशांत गुरव
महानगर कार्यालय मंत्री – शुभम संजय कुलकर्णी
महानगर अर्थ कोष प्रमुख – प्रथमेश संजय नाईक
महानगर व्यवस्था प्रमुख – नितीन जितेंद्र पाटील
महानगर व्यवस्था सहप्रमुख – प्रसाद शशिकांत जोशी
कार्यकारणी सदस्य – शुभांगी पांडुरंग निकम
कार्यकारणी सदस्य – अद्वैत राहुल जोशी
महानगर विस्तारक – विशाल गुरूनाथ जोशी
सोशल मीडिया संयोजक – विवेक तानाजी ढोकणे
मीडिया संयोजक – ओमकार अशोक आव्हाड
जनजाती कार्य प्रमुख – संस्कृती शरद शेळके
जनजाती कार्य सहप्रमुख – अजय भास्कर बहीरम

TSVK संयोजक – व्यंकटेश केतन औसरकर
फार्म व्हिजन संयोजक – प्रणव केशव जगताप
ॲग्री व्हिजन संयोजक – ओमकार संजय देशमुख
जिज्ञासा संयोजक – मोहात मिलन कांचन

SFD संयोजक – आर्यन संजय भैसे
SFS संयोजक – नितेश सुरेश गुप्ता
RKM संयोजक – अक्षय अशोक खुळात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *