सणांच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिके


दक्ष न्यूज प्रतिनिधी : रूपाली केदारे

मनमाड : जिल्ह्यासह तालुक्यात येऊ घातलेल्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस आयुक्त शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख व मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व उपविभाग यांच्यासह मनमाड, नांदगाव, येवला तालुका, येवला शहर, चांदवड, वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार कर्मचारी यामध्ये सहभागी होत.

या वेळेला पोलीस कवायत मैदान मनमाड येथे विविध गटाकडून दंगा नियंत्रण गट यांनी एखादी घटना घडल्यास दंगा नियंत्रण पथक व इतर पथक हे कशाप्रकारे आपले कार्य बजावतात हे या माध्यमातून जनतेला आपण सुरक्षित आहात हे दाखविण्यात आले. त्या अनुषंगाने या गटांतर्फे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यामध्ये दंगा नियंत्रण जमाव पांगवण्याकरता हवेत गॅस सोडणे, जखमी व्यक्तींना उपचाराकरता हलवणे, लाठी चार्ज, अग्निशामक दल, रुग्णवाहिका या सर्व गोष्टींवर पोलीस प्रशासन यांनी आपली प्रास्ताशीके सादर केली. या वेळेला पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी व स्थानिकांनी एकच गर्दी केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *