मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्र : गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. Maratha Manoj Jarang finally gave up his hunger strike

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. तसेच, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. त्याशिवाय, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही सरकारने मान्य केलं आहे.
राज्य सरकारला महिन्याभराचा अवधी देण्याचा निर्णय बुधवारीच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं.