नाशिक

जळगांव फाटा येथे सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सोडले


दक्ष न्यूज प्रतिनिधी: योगेश कर्डिले

निफाड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव फाट्यावर सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी दि 14 रोजी सकल मराठा समाज बांधवांनी सोडले.


मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन म्हणून समर्थन म्हणून जळगांव, कोठूरे, काथरगाव, सुंदरपूर, रसलपूर या 5 गावातील सकल मराठा समाज बांधवांनी मंगळवार दि 12 पासून तालुक्यातील जळगांव येथील जळगांव फाट्यावर साखळी उपोषण सुरू केले होते
गुरुवारी या साखळी उपोषणात अमोल वडघुले ,प्रवीण वडघुले , काथरगावचे सरपंच किशोर वाघ, सुंदरपूरचे अनिल सोमवंशी विनोद सोमवंशी जगदीश सोमवंशी इरफान खान विजय सोमवंशी, रसलपूरचे सरपंच केशव सातभाई, सोमनाथ वडघुले, शुभम वडघुले, सौरभ वडघुले, सुनिल वडघुले, रामा वडघुले, संतोष सोमवंशी, मयूर वडघुले, भूषण पंडित, शरद वाघ, चेतन मोगल, अमित पुरकर, अमित वडघुले आदीनी सहभाग घेतला. गुरुवारी दुपारी 12 वाजता निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या हस्ते सरबत घेऊन अमोल वडघुले यांनी हे उपोषण सोडले याप्रसंगी निफाड पोलीस ठाण्याचे पोऊनि आनंद पठारे , सपोनि ईश्वर पाटील उपस्थित होते.

सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न एक महिन्यात सोडवण्याचे जे आश्वासन दिले आहे त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात येईल – अमोल वडघुले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *