गजानन शेलार लढवणार विधानसभा निवडणूक, स्नेह मेळावा घेत समर्थकांनी केले शक्ती प्रदर्शन
दक्ष न्यूज: करणसिंग बावरी
नाशिक : दंडे हनुमान मित्र परिवार तसेच माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी गजानन शेलार यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी काठे गल्ली द्वारका परिसरातील शहनाई लॉन्स येथे स्नेह मेळावा मिसळ पाटीचे आयोजन करण्यात आले होते. दंडे हनुमान मित्र परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात दंडे हनुमान मित्र मंडळ तर्फे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक विधानसभेतून कोणत्याही परिस्थितीत माघे न हटता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी करावी असा ठराव नंदन भास्करे यांनी मांडला व या ठरावाला तेजस शिरसाठ यांनी अनुमोदन देत सर्वांमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी गोकुळ पिंगळे यांनी बोलताना सांगितले की, गजानन नाना एक खंबीर असं नेतृत्व आहे. नाना हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत नवा चेहरा म्हणून समोर येतील त्यामुळे नानांना जर मध्य नाशिक मधून तुम्हाला सर्वांना निवडून आणायचे असेल तर सर्वांनी एक दिलाने काम केले पाहिजे व प्रत्येक पक्ष हा एक सर्वे करत असतो त्या सर्वेनुसारच उमेदवारी मिळत असते नानांना उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत नानांनी केलेली काम पोहचवली पाहिजे जेणेकरून उमेदवार निवडताना नानाच आघाडीवर असतील व पक्षही त्यांनाच उमेदवारी देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या मेळाव्यात गजानन शेलार यांनी बोलताना सांगितले की, मी पक्षाचा एकनिष्ठ असा कार्यकर्ता असून पक्ष मला जि जबाबदारी देईल ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेल जर पक्षाने मला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी सांगितले तर पूर्ण ताकतीने लढून निवडून येण्याचा पूर्ण प्रयत्न आमचा असेल. मी पक्षाशी गद्दारी करणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो व नाशिक दिंडोरीची सीट निवडून आणली त्याच पद्धतीने ज्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्यासाठी काम करेल. सर्वांना विश्वासात घेऊन दंडे हनुमानाने पुढील रणनीती आखावी व आपल्या कामाला लागावे असे सांगितले.
या मेळाव्यात भूषण कर्डिले, शशी हिरवे, उमाकांत मोटकरी, विशाल चव्हाण, नंदन भास्करे यांच्यासह असंख्य नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत शेलार यांना उमेदवारी करण्याचे आवाहन केले. दंडे हनुमान मित्र मंडळ तर्फे व उपस्थित नागरिकांच्या वतीने गजानन नाना शेलार यांचा भव्य सत्कार करीत उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, भूषण कर्डिले, शशी हिरवे, उमाकांत मोटकरी, विशाल चव्हाण, सुरेश दलोड, संजय मंडलिक, भिकाभाऊ शिंदे, अजय तसंबड, नंदन भास्करे, तेजस शिरसाठ, जयेश आमले, धनंजय राहणे, मंथन मोटकरी, भावणेश राऊत यांच्यासह दंडे हनुमान मित्र मंडळातील पदाधिकारी व गजानन शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.