स्वतंत्र महामंडळ निर्मितीसाठी समाजाच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलनासाठी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे – गांधले
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
ढोर समाज जागा हो । संघर्षाचा धागा हो ।। संत कक्कयाचा वारस हो । समाजाचा पालक हो ।।
नाशिक : वीरशैव कक्कया ढोर जातीसाठी संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ ” निर्माण करणे व इतर मागण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन येत्या शुक्रवार दिनांक २८ जून २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथ होणार असून नाशिक शहरातील सर्व समाज बांधवांनी स्वतंत्र महामंडळ निर्मितीसाठी समाजाच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी धरणे आंदोलन साठी जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहावे अशी सूचना रविवार १६ जून २०२४ रोजी आयोजित बैठकीत अध्यक्ष पिंटू गांधले यांनी मंडळाला केली आहे.
त्याप्रसंगी उपाध्यक्ष संजय नारायणे, अनिल शिंदे, सनी सपकाळ, संजू बोराडे, सुनील नारायणे, सोमनाथ जाधव, गणेश इंगळे, राजाभाऊ अहिरे व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.