MRP कायद्यातील तरतुदीचे माध्यमातून फसवणूक; अखिल भारतीय ग्राहक पंचायत नाशिक जिल्हा सतर्क
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : कमाल किरकोळ विक्री मूल्य (MRP) कायद्यातील तरतुदीचा, वस्तू उत्पादक सर्रास गैरफायदा घेत असून मनमानी पद्धतीने (MRP )विक्री मूल्य छापले जाते व त्यामुळेच विक्रेता MRP वर भरमसाठ सवलत देऊन वस्तू विकतात. या अनुचित व्यापारी पद्धतीचा वापर करून ग्राहकांची प्रचंड फसवणूक करण्याचा सपाटा बाजारात सुरू आहे.
MRP कायद्यातील तरतुदीचे माध्यमातून सुरू असलेलया या फसवणूकीकडे केंद्र सरकार व प्रशासन यांचे लक्ष वेधणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नाशिक जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष इंजि हिरा जाधव, जिल्हा सहसंघटक चंद्रकिशोर हुमणे, जिल्हा सहसचिव उदय सोनवणे , रोजगार सृजन प्रमुख विशाल देसले, सदस्य अरविंद, दीक्षित प्रसिद्धी प्रमुख दिनेश भागवत, सदस्य तेजस सुर्यवंशी आदी जिल्हा व तालुका प्रतिनिधी च्या शिष्टमंडळातर्फे केंद्रीय ग्राहक कल्याण व व्यवहार मंत्री व केंद्रीय सचिव यांना अग्रेशित असलेले निवेदन नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले.
MRP किंमतीवर मनमानी पद्धतीने डिस्काउंट देत एकावर एक फ्री पासून तर प्रसंगी 200 टक्के सुद्धा सूट देण्याचे आमिष देणाऱ्या अनैतिक बाजार पद्धतीला आळा घालता येईल. सध्या MRP पेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकणे गुन्हा असल्याने MRPच्या किमती शंभर ते हजारांचे पटीत वाढ करून डिस्काउंट चे आमिष दिले जाते आणि ग्राहकांची फसवणूक किंवा ग्राहकांना ठगवले जात आहे.
फर्स्ट सेल उत्पादन किंमत कायदेशीर पणें निश्चित करून त्यावर कर अधिक नफा अकारून कमाल किरकोळ विक्री मूल्य निर्धारीत करण्यात यावे , यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने देशभर मागणी आंदोलन उभारले आहे. या मागणीसाठी प्रसंगी प्रखर जनआंदोलन करावे लागले तरी त्याची सुद्धा तयारी करण्यात येईल.
MRP संरचनेत ग्राहकाभिमुख अमुलाग्र बदल करणेसाठी सामाजिक विचारवंत, पत्रकार , ग्राहक ,व्यापारी व राजकीय प्रतिनिधींनी पुढे यावे असे अ भा ग्रा पं तर्फे आवाहन करण्यात येत आहे. MRP किंमत निश्चिती प्रक्रियेत सरकारने महत्त्वपूर्ण कायदेशीर नियंत्रकम्हणून भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एम आर पी संरचनेत बदल करावा. या मागणीवर अ भा ग्रा पं ठाम आहे.