देशनाशिकमहाराष्ट्र

येणारा काळ हा आयुष चिकित्सा पद्धतींच्या उज्वल भवितव्याचा – डॉ मनोज नेसरी


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

  • जिज्ञासा ची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद 2024 उत्साहात संपन्न

नाशिक : “आयुर्वेद, योग, होमिओपॅथी यासह आयुष मधील विविध उपचार पद्धतींचे आज जगभर स्वागत होत आहे. सध्याच्या काळात संपूर्ण मानव जातीला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांच्या समाधानासाठी या आयुष चिकित्सा पद्धतीकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे. त्यामुळे येणारा काळ हा आयुष चिकित्सा पद्धतींच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे” असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे आयुर्वेदिक विभागाचे सल्लागार डॉक्टर मनोज नेसरी यांनी केले. जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद आणि स्टेट आरोग्य मेळाव्याच्या समारोप सत्रा मध्ये ते बोलत होते.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवलक्य शुक्ल, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, एम यू एच एस च्या आयुष विभागाच्या समन्वयक डॉ गीतांजली कारले, अभाविप चे नाशिक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ, महानगर मंत्री श्री ओम मालूंजकर, आंतरराष्ट्रीय परिषदेचे सचिव डॉ रोहन मुक्के, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र संयोजक डॉ रजनी गायकवाड यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.


“आयुष उपचार पद्धतीं मुळे आपला भारत देश जगामध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून प्रभावी होण्यास निश्चित मदत होऊ शकते… त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी आयुर्वेद – योग – होमिओपॅथी अशा आयुष चिकित्सा पद्धतीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या देशाच्या आरोग्य सेवेमध्ये आपले योगदान द्यावे”, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी विद्यार्थि, वैद्य,डाॅक्टर यांच्या शि संवाद साधताना केले…विद्यार्थी निधी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जिज्ञासा यांच्या सहयोगाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद व राज्य आरोग्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन कालिदास कलामंदिर, नाशिक येथे करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित राज्य आरोग्य मेळाव्यास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.


भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे साधारण १५०० हून अधिक नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली ह्या मेळाव्याला 25000 पेक्षा अधिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली.ह्या परिषदे मध्ये विविध सत्र झाले.
या परिषदेच्या निमित्ताने नागरिकांना आयुर्वेदाची ओळख व्हावी यासाठी एका प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनी मध्ये विविध फोटो पोस्टर्स द्वारे आरोग्य रक्षणासाठी आपली दिनचर्या आहार कसा असावा याविषयीचे मार्गदर्शन या “दिवंगत वैद्य एल. महादेवन प्रदर्शन” कक्षाद्वारे जिज्ञासा च्या टिम द्वारे करण्यात आले…

या वेळी विविध स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्या पैकी हृषीकेश सूर्यवंशी, वेदश्री भालेराव, श्रुती उगले , डॉ वनश्री तुप्पड,डॉ एच.सी.सुमा,वैष्णवी जुगधर, डॉ संतोष पाठक, डॉ मयुरी पाटील, डॉ आरती पाटील, नम्रता जाधव, भाग्यश्री नागरे,यश साळवे, राधा चौधरी, डाॅ निकीता मेहता,डाॅ कमलेश घोलप, डाॅ कविता जराड, लक्ष्मी महाजन, पायल बेडमुठे, भाग्यश्री चौधरी ,दिपाली राऊत ,खिशीज चौधरी, वंदना वाढवाने, धनश्री पेटेकर, नवनित दर्डी, श्रेया आवटे,यशा सावला, खुशी रामधनी, प्राजक्ता पाटील, निखिल चव्हाण,श्रीप्रिया शिरहाटी, राजेश्वरी परबत, आरती सोलंकी, पायल मदने, डाॅ अर्चना सोनवणे, डॉ पुजा यादव,डाॅ सिमरन दर्डी,पठाण सैफ, अनिकेत पाटील, डॉ सुनिधी जोशी ,डॉ मोहम्मद आयशा सदा,रुक्सार सिद्धीकी, स्नेहल वडाणे, मनिषा मोरे, पुष्पदीप जाधव, माणिक छाबरा, डाॅ मोहम्मद आयेशा सदा, वैष्णवी पेंढरकर अश्विनी बंडगर, सिद्धी काळे,डाॅ शुभांगी माळी इत्यादींची विजेता म्हणून निवड करण्यात आली. एकूणच आयुर्वेदिक योग होमि ओपॅथी इत्यादी आयुष्य शास्त्रांविषयी समाजामध्ये प्रबोधन करणारा राज्यीय आरोग्य मेळा आणि आयुर्वेदाची शास्त्रीय भाषेमध्ये मांडणी करणारी आंतरराष्ट्रीय परिषद नाशिक शहरांमध्ये यशस्वीपणे संपन्न झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *