सत्यदर्शी सोशल फाउंडेशन व पोलीस मित्र समिती यांच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..


दक्ष न्युज प्रतिनिधी, आदिती ठाकूर

दहिवड : सत्यदर्शी सोशल फाउंडेशन व पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा दिनांक 14 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती ते निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 30 एप्रिल रोजी कै.लक्ष्मीबाई देवरे विद्यालयात करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. ज्ञानेश्वर जाधव, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मा.श्री. संतोष जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्याध्यक्षा श्रीमती कल्याणी ताई धोंडगे, पोलीस मित्र समितीचे राज्यध्यक्ष श्री. आनंद दाणी,सत्यदर्शी चे अध्यक्ष श्री. दिनेश पगारे, पत्रकार श्री. आदिनाथ सूर्यवंशी, पत्रकार श्री. प्रशांत गिरासे,यांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम आलेला कु.जय कृष्णा पवार, द्वितीय आलेली कुमारी. यामिनी दिनकर शेवाळे, तृतीय तनूजा समाधान मोरे. यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.व उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांनी जर शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर नक्कीच यशस्वी होतील. आणि महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास भविष्यात कुठलीच अडचण येत नाही. सत्यदर्शी सोशल फाउंडेशन ने खूप चांगला उपक्रम राबवला आहे आणि भविष्यात पण राबवावा त्यांना माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन देवळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.
विद्यार्थ्यांनी अधिकाधिक शालेय पुस्तकांसोबतच महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वाचावी म्हणजे अभ्यासासोबतच चांगल्या विचारांची भर त्यांच्या ज्ञानात पडेल असे प्रतिपादन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मा. संतोष तात्या जाधव यांनी केले.

मुलींसाठी करिअरच्या अनेक संधी भविष्यात उपलब्ध आहेत त्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर मेहनत केल्यास ते नक्की यशस्वी होतील. मुलींना काही अडचणी असल्यास त्यांनी आपल्या पालकांशी त्याचबरोबर आपल्या शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोलावे आणि आपल्या आई-वडिलांचे नाव नेहमी उंचावत ठेवायचं असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष कल्याणी ताई धोंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री चव्हाण सर यांनी केले.

यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष संतोष तात्या जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा कल्याणी ताई धोंडगे, पोलीस मित्र समितीचे राज्यध्यक्ष आनंद दाणी, पोलीस मित्र समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे,पत्रकार आदिनाथ सूर्यवंशी, पत्रकार प्रशांत गिरासे, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे भामरे सर,कै.लक्ष्मीबाई देवरे विद्यालय यांचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी कृष्णा पवार,महेंद्र सूर्यवंशी,त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *