निफाड नगरपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा..


दक्ष न्युज प्रतिनिधी, योगेश कर्डीले

निफाड: १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. याच पार्शवभूमीवर निफाड नगरपंचायत कार्यालयात येथे देखील महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक तथा सभापती बांधकाम विभाग किशोर ढेपले यांच्या हस्ते नगरपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले.

सदर ध्वजारोहण प्रसंगी संपत व्यवहारे सर, नगराध्यक्ष डॉ.कविता दारराव, उपाध्यक्ष अनिल कुंदे,नगरसेविकास शारदाताई कापसे, अरुंधती पवार,रत्नमाला कापसे, रूपालीताई रंधवे,पल्लवी जंगम विमलबाई जाधव तसेच नगरसेवक बर्डे सर,जावेद शेख,ललित गीते, बंटी भाऊ शिंदे, महेश जंगम, नंदू भाऊ कापसे, नाना कर्डिले आणि नगरपंचायत चे अधिकारी /कर्मचारी आदींसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी नागरिकांना मतदानाविषयी जनगागृती देकील करण्यात आली. तसेच याप्रसंगी पत्रकार वर्ग देखील मोठ्या संख्येने उपथित होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *