भगुरला ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धा; बलकवडे आंतरराष्ट्रीय व्यायाम शाळेच्या वतीने आयोजन..


विजयींची होणार राष्ट्रीय स्पर्धेत निवड, पैलवान विशाल बलकवडे यांची माहिती..

दक्ष न्युज प्रतिनिधी, भास्कर साळवे‌

भगुर: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व रेसलिंग आसोशियन आॉफ नाशिक यांच्या सहकार्याने भगुर बलकवडे आंतरराष्ट्रीय व्यायाम शाळा येथे दिनांक ३० पासुन ते १ मे पर्यंत वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे संलग्न ४२ शहर जिल्हा कुस्तीगीर संघ सहभाग घेत असुन एका संघातुन वेगवेगळ्या गटाद्वारे दहा कुस्तीगीर असे पाचशे मल्ल व पंच सहभागी होत आहेत भगुर येथे होत असलेली स्पर्धा भारतीय कुस्ती महा संघाच्या मान्यतेतुन होत असल्याने या स्पर्धेतील विजेते कुस्तीगीर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होतील तसेच या स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगीरांना शासनाकडून मानधन देण्यात येईल तसेच विजेत्या कुस्तीगीरांना शासनाकडून पाच टक्के नोकरी मघ्ये आरक्षणाचा लाभ मिळेल तरी या कुस्ती स्पर्धला जास्तीत जास्त कि्डाप्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • स्पर्धचा असा असेल कार्यक्रम

मंगळवार ३० एप्रिल २०२४ दुपारी तीन पर्यंत आगमन दुपारी तीन ते चार कुस्तीगीर कागदपत्र तपासणी दुपारी चार ते पाच कुस्तीगीराचे मेडीटेशन व वजने संध्याकाळी सहा ते नऊ उद्घाटन व कुस्ती स्पर्धा प्रारंभ बुधवार एक मे २०२४ सकाळी आठ पासून कुस्ती प्रारंभ स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण

  • असे आहेत वजन गट

५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७‌,८२, ८७, ९७ व १३०‌ किलो असे असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *