मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ. संदीप भानोसे..
नाशिक: आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण ! स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा विशेष मिल्ट्री कॅम्प च्या माध्यमातून स्व विकास साधता येतो असे गौरव उद्गार व्यवस्थापन तज्ञ डॉ संदीप भानोसे यांनी केले.

डॉक्टर मुंजे सभागृहात भोसला मिलिटरी कॅम्पस मध्ये डॉक्टर संदीप भानोसे यांचे यशाचे रहस्य यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नल संदीप पुरी यांनी भानोसे यांची ओळख करून दिली तसेच शाल , श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ भानोसे यांनी म्हटले की ,” गरुड झेप घेण्याकरिता सकारात्मक विचार, ध्येयनिश्चिती, शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास , जागरूकता, अपयशाला घाबरून न जाणे, सातत्य ” असे गुण धारण करणे आवश्यक आहे.
कर्नल पुरी यांनी आपल्या भाषणात म्हटले की ,” अशा मिलिटरी कॅम्पमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राबद्दल जाणीवा जागृत केल्या जातात तसेच मुलांना मिल्ट्री प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो”. आभार प्रदर्शन सुभेदार दीपक चव्हाण यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सातत्यपूर्ण 2249 दिवसाचे वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान एकत्रितरीत्या राबविले.