गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबुन ठेवणारे आरोपी जेरबंद…


दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक: शहरात सद्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यात जनावर कत्तलीच्या घटना दिवसानुदिवस वाढत चालल्या आहेत. याच पार्शवभूमीवर गुन्हेशाखा युनिट २ ने गोवंशीय जनावरांची कत्तल करून व २० गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबुन ठेवणारे आरोपी जेरबंद केले आहे.

  • याबाबत सविस्तर:

पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली की, भद्रकाली पोलीस स्टेशन हददीत लिग्रारानीया रोडवर, सागर बेकरी समोर, रजा मुरी इलेक्ट्रीकल गोडाउन चे मागे, बंद असलेल्या पत्रयाचे शेड मध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालु आहे. माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जावुन अंदाने १४०० किलो वजनाचे गोवंशीय जनावराचे मांस व २० गोवंश जनावरे, मांस वाहतुकीचे वाहन असे ५,५४,००० रूपये मुददेमाल सह आरोपींना ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, प्रशांत बच्छांव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सितारात कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोउपनि अजय पगारे, सपोउनि यशवंत बेडंकुळे, सपोउनि बाळु शेळके, सपोउनि विवेक पाठक, पोहवा प्रकाश भालेराव, पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर, पोहवा अतुल पाटील, पोअं जितेंद्र वनीरे यांसह पथकाने केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *