ब्रेकिंग! खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात..


दिल्ली: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. नवी दिल्लीमध्ये त्यांचा हा भीषण अपघात झाल्याचं समोर येतं आहे. नवी दिल्लीतील बि डी मार्गावर खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सुदैवाने यात खासदार हेमंत गोडसे बचावले असून त्यांच्या गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघात इतका भीषण होता की यात खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यात खासदार हेमंत गोडसे व त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *