1999 नंतर प्रथमच होणार नाशिक पालिकेत नोकर भरती…


दक्ष न्युज : प्रतिनिधी

नाशिक: सध्या नाशिक महानगरपालिकेत महत्त्वाची असणारी इंजिनीयर व इतर महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे अतिशय कनिष्ठ अधिकाऱ्याकडे चार्ज देऊन कामकाज करावे लागत आहे. नाशिक शहरात आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून यासाठी नाशिक महानगरपालिकेत पुरेसे कर्मचारी व अधिकारी असणे खुप गरजेचे आहे. तसेच इंजिनीयर सारखी तांत्रिक पदांवर नाशिक महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी असणे गरजेचे आहे.

1999 पासून नाशिक महानगरपालिकेत भरती झाली नसल्यामुळे नाशिक महानगरपालिकेतील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी देखील अधिकारी उपलब्ध नसल्याने नाशिककरांच्या मुलभूत सुविधा पुरवताना पालिकेची तारांबळ उडते. महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे आकृतीबंध मंजूर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे असीम गुप्ता , नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी स्पष्ट केले.

सध्या रिक्त असणारी महत्वाची पदे भरणे आवश्यक असल्याचे सांगून याबाबत नाशिक महानगरपालिकेने शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा व नगर विकास विभागाने लवकरात लवकर महानगरपालिकेतील महत्त्वाची पदे भरण्यासाठी मान्यता द्यावी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. यामुळे नाशिक महानगरपालिकेतील महत्त्वाची पदे भरण्याचा मार्ग खुला झालेला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *