धक्कादायक! एकलहरे येथे तरुणाची निर्घृण हत्या..


दक्ष न्युज प्रतिनीधी, दिनेश पगारे

नाशिक: येथील एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या समोर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोटावर धारदार हत्याराने हल्ला करून हा खून करण्यात आला आहे. तरुणाचा मृतदेह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिसून आल्याने हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शहरात खुनाचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. कोयता हल्ला, गोळीबार यांसारख्या घटनांनी शहर हादरले असून गुंडांचे राज्य आहे का ? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थीत करीत आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या जखमा आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खून करण्यात आलेल्या तरुणाची ओळख अजून पटली नसून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *