१ लाखाची लाच घेतांना आरोपी ताब्यात; ग्रामसेवक मात्र फरार…
दक्ष न्युज प्रतिनिधी, संतोष विधाते
जळगाव: सद्या लाचेची प्रमाण चांगलेच वाढले आहे. यातच भर म्हणून जळगाव मधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. जळगाव येथे १ लाखाची लाच घेताना आरोपीला रंगेहात पकड्ण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे चुंचाळे, यावल गावी वडीलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये १५ वित्त आयोगाच्या शिफारशी मधुन गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.

सदर मंजुरीच्या रक्कमेतून ५० % प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक नामे हेमंत जोशी यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने आरोपी सुधाकर कोळी यांना चुंचाळे ग्रामपंचायत येथे एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेतील आरोपीला जळगाव पोलीस पथकाने ताब्यात घेतला असून ग्रामसेवक मात्र फरार आहे. तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. दरम्यान संबंधित फरार ग्रामसेवकाचा तपास देखील पथक घेत आहे.