दिंडोरीत निर्भय महाराष्ट्र पार्टीचा आक्रोश मोर्चा..
दक्ष न्युज प्रतिनिधी , संतोष विधाते
दिंडोरी: निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे, राज्य उपाध्यक्ष तुषार निकम, राज्य सचिव जगबीर, यांचे आधिपत्य खाली दिनांक १६ फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी पंचायत समितीत दिंडोरी येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याचा उद्देश दिंडोरी तालुक्यातील खेडे गावातील ग्रामपंचायतीच्या कामाबदल सस्विस्तर माहीत भेटत नसलेल्याने कोंडी होते.
तसेच शासकीय योजनेंतर्गत होणारे कामकाज कमी प्रमाणात आढळून येतात व खेड्या गावात अस्वच्छता असते, तसेच रस्त्यात लागत कचरा असतो, त्या कचऱ्यापासून रोगराईचे प्रणाण वाढते व हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी लोकसंख्या प्रमाणे सर्वाजनिक शौचालय, बांधण्यात यावे. तसेच ग्रामपंचायत मधे कामकाजाचे माहीत फलक लावण्यात यांवे घरकुल घोटाळा मोठ्याप्रमाणात आढळून येतो, व इतर काही मुद्दे मांडून माननीय गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस मोर्चाच्यात दिंडोरीत तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे आयोजन मा जि, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित, महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई रेहरे, प्रीया गोतरणे, दिंडोरी पेठ विधानसभा अध्यक्ष चंदर, तालुकाध्यक्ष दिगंबर गायकवाड, उपाध्यक्ष पाडु गावंढे, शहर प्रमुख संजय सिंघवी, कैलास बेडंकोळी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायधनी, संघटन मंत्री चेतन सुर्यवंशी, शेतकरी अध्यक्ष सुनिल धात्रक आदिंसह बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थितीत होते.