युद्धकला चॅम्पियनशिप-२०२३ यशस्वीरीत्या संपन्न..
उपस्थितांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा..
नाशिक: नाशिकच्या पंडित कॉलनी येथे मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता बाल गणेश उद्यान पंडित कॉलनी, नाशिक येथे मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिप-२०२३ यशस्वीरीत्या पार पडली. मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिप वेळी खेळाडूंचा उच्चाह पाहण्यासारखा होता.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख श्री अजय बोरस्ते, राजा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजाता श्री सहबराव पाटील ,नाशिक जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री विशाल खेरनार, राष्ट्रीय मर्दानी युद्धकाल गुरुकुल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अजिंक्य हिंगमिरे, सचिव श्री परिश्रुत क्षीरसागर, प्रशिक्षक श्री बंटी भागवत,श्री विकी लहाने या अतिथींनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.