नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरा..
अनेक मान्यवरांची उपस्थिती..
नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास शहर अभियंता शिवकुमार वंजारी,सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे,शहर कार्यक्रम व्यवस्थापक शैलेश लोंढे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद नितीन गंभीरे,हुसेन पठाण,वीरसिंग कामे सागर पीठे,कृष्णा पडोळ,दिलीप चौधरी,अरुण महाले,विशाल घागरे, जगदीश देशमुख,संजय पटेल,भरत सांगोरे,दयानंद पेंढारकर,अनिल गीते,रवींद्र मगर,आनंद भालेराव,सुनील नागपुरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.