भव्य गणेशोत्सव सजावट व आरास स्पर्धा 2023
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
- दक्ष न्युज व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचा एकत्रित उपक्रम
नाशिक : आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत असून, त्यांच्या स्वागतासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास. या पार्श्वभूमीवर ‘दक्ष न्यूज’ आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरातील सहाही विभागातील उत्कृष्ट आरास असलेल्या मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
उत्कृष्ट सजावटीसह उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट समाजप्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा तसेच शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारे स्पर्धा होईल. या विजेत्या मंडळांना विभागवार प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाचे व एक उत्तेजनार्थ अशी एकूण 24 पारितोषिके देण्यात येतील. त्यात पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड या भागांचा समावेश आहे. घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत शहरातून एकूण प्रथम तीन क्रमांकाचे व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण ५ पारितोषिके देण्यात येतील. ही स्पर्धा नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागी मंडळांना व कुटुंबाना प्रमाणपत्र देण्यात येतील.
बक्षीस समारंभाची तारीख ‘दक्ष न्यूज ’ वर प्रसारित करण्यात येईल. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व मंडळांचे देखावे पाहण्यासाठी परीक्षक कधीही देखावास्थळी भेट देतील. यासाठी मंडळाने दर्शनी भागात स्पर्धेत सहभागाचा बॅनर लावणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन दक्ष न्यूज चे संचालक व संपादक करणसिंग बावरी व अमित कबाडे तसेच पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील परदेशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विरेंद्रसिंग टिळे, जिल्हा अध्यक्ष कैलास सुर्यवंशी यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
- ऑनलाईन अर्जाची लिंक 🔗
https://forms.gle/sPDcZqth3NV9Z5bT9
स्पर्धेत सहभागासाठी गणेश स्थापना 19 ते 26 सप्टेंबर गणेश विसर्जन दरम्यान आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद मंडळांनी व घरगुती गणेश भक्तानी घ्यावी. अधिक माहितीसाठी 9511944111 / 9325433331 वर संपर्क साधावा.