सुरु होता आदिवासी समाजाच्या जीवनाशी खेळ


दक्ष न्यूज प्रतिनिधी: उमेश कापडणीस

  • कळवण – दळवट येथील बोगस डॉक्टरवर कारवाई
  • सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या सतर्कतेने वाचले आदिवासींचे प्राण

कळवण : तालुक्यातील दळवट येथे कळवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या फिर्यादनुसार अभोणा पोलिसांनी कारवाई करीत बोगस डॉक्टरचा भांडाफोड केला आहे. बोगस डॉक्टर विकी शालिंदर जाधव रा. लखमापूर, ता. सटाणा याला अटक केली आहे. तालुक्यात आदिवासी दुर्गम भागातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

कळवण हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी समाजाची जुनी पिढी बहुतांशी अडाणी पिढी आहे. स्व आदिवासी विकास मंत्री ए टी पवार यांनी या तालुक्यात शासकीय आश्रम शाळांचे जाळे विणले आहे. त्यामुळे त्यांची पुढची पिढी सुशिक्षित होत आहे असे असतांना तालुक्यातील दळवट गावात बस स्थानिक समोरील गाळ्यांमध्ये बोगस डॉक्टर विकी शालिंदर जाधव याने अनेक दिवसांपासून आपला दवाखाना थाटला आहे.

दि २४ रोजी प्रांत तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे दळवट गावाची पाहणी करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांच्या तक्रारी नुसार येथे बोगस डॉक्टर असल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, अभोणा पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, दळवट प्राथमिक अयोग्य केंद्राचे वॆद्यकीय अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली.

खासदार तथा केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या मतदारसंघातील कळवण तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. अनेक डॉक्टराणी गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून थाटामाटात दवाखाने सुरु केले आहेत. ते राजरोसपणे सुरु आहेत. याकडे तालुका आरोग्यग्य विभागाचे कायमच दुर्लक्ष झाले आहे. यापुढे तरी या बोगस डॉक्टरांचा बंदोस्त होऊन आदिवासींच्या आरोग्याशी व जीवनाशी खेळाचा प्रकार थांबेल का ? असा सवाल आदिवासी बांधवानी केला आहे.

त्यानुसार चौकशी केली असता बोगस डॉक्टर जाधव याचे कडे ३१ हजार ६२१ रुपये किमतीचे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व ऍलोपथी औषधे आढळून आले म्हणून दळवट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भास्कर मन्साराम गवळी यांचे फिर्यादीनुसार भादंवि कलम ४१९, ४२० , २७६, ३३६ सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३, ३३ (अ ) प्रमाणे अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *