एका ‘मराठी तरुणाने’ बनवली ‘टेसला’ ला टक्कर देणारी ‘इलेक्ट्रिक बाईक’
दक्ष न्यूज : करणसिंग बावरी
नाशिक : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका येथील गोराणे या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाने जवळ जवळ टेसला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या बरोबरी ने फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाईक बनवून दाखवली आहे.

भुषण नंदू कदम असे या तरुणाचे नाव असून मुंबई युनिव्हर्सिटी मधून फिजिक्स या शाखेतून त्याने आपली मास्टर डिग्री पूर्ण केली असता परदेशात जॉब ची संधी असताना देखील त्याने भारतातच राहून देशासाठी काही इनोव्हेशन करायचे ठरवले.
याच काळात इलेक्ट्रिक बाईक इंडस्ट्री ने जोर पकडला व भारतातील मेट्रो शहरात ओला, ईथर सारख्या इलेक्ट्रिक बाईक दिसू लागल्या, परंतू काही काळ सुरळीत चालल्या नंतर भारतातील इलेक्ट्रिक व्हेयीकल इंडस्ट्री ला जणू कुणाची नजर लागली व दर काही दिवसांनी इलेक्ट्रिक बाईक पेट घेण्याच्या, फुटण्याच्या घटना बाहेर येऊ लागल्या, त्यामुळे लोकांचा EV वरील विश्वास कमी होऊ लागला अणि एकेकाळी भारताचं भविष्य मानली जाणारी इंडस्ट्री दुर्लक्षित केली जाऊ लागली.
भुषण ने याच परिस्थितीत एक संधी बघितली, व कॉलेजच्या अखेरच्या वर्षातील प्रोजेक्ट रिसर्चसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल हा विषय निवडला. इलेक्ट्रिक व्हेईकल वर रिसर्च करत असताना त्याच्या असे लक्षात आले की या इलेक्ट्रिक गड्यान मधील बॅटरी मध्ये तयार होणार्या हीटींगला कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशेष व्यवस्था नसल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढून गाड्या पेट घेता व इलेक्ट्रिक गाडीतील सर्व कॉम्पोनंट पैकी सर्वात महाग असणाऱ्या बॅटरीची क्षमता अणि जीवनकाल देखील कमी होतो.
या समस्येला दूर करण्यासाठी त्याने स्वतः चि हीट मॅनेजमेंट सिस्टम इन्व्हेट केली, ज्यामुळे बाईकच्या बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहून ती चालका साठी आणखी सुरक्षित बनली. अणि एवढेच नाही तर आधी ज्या बॅटरीचे आयुष्य २-३ वर्ष मानले जायचे त्या बॅटरीचे आयुष्य ८-१० वर्षांपर्यंत जाऊन पोहोचले.
आणखीन एक समस्या जी इलेक्ट्रिक बाईक धारकांना भेडसावत असे ती म्हणजे चार्जिंग साठी लागणारा ६ ते ७ तासांचा वेळ. परंतु या सिस्टम मुळे बॅटरी गरम होत नसल्या मुळे फास्ट चार्जिंग करणे शक्य झाले आहे. त्यामुळे जी गाडी चार्जिंग साठी आधी ६-७ तास घ्यायची ती आता मात्र ३०-३५ मिनटात पूर्ण चार्ज होऊन जाते. अणि एका चार्ज मध्ये १६०-१८० की. मी. प्रवास करण्याची क्षमता ठेवते तसेच व्हॉईस कमांड, फिंगर प्रिंट लॉक, गुगल नेवेगेशन, ऑल टाइम लोकेशन ट्रेकिंग सिस्टीम व अशेच आणखी स्मार्ट फीचर्स असणारी ही भारतातील पहिली स्मार्ट बाईक आहे.
पेट्रोल चे वाढते दर बघता भारतातील वाहतूक क्षेत्रात ही टेक्नॉलॉजी अत्यंत क्रांतिकारक ठरू शकते. पुढील प्लॅन बद्दल भुषणला विचारले असता त्याने कळवले की लवकरच बाईक चे मास प्रोडक्शन सुरू करून तिची Phoenix E-Mobility या कंपनीच्या नावाने देश भरात विक्री सुरू करण्यात येईल. तरी सध्या तो व त्याची टीम सरकार व इन्व्हेस्टर सोबत संवाद साधण्याच्या प्रयत्नात आहे.