गुन्हा दाखल होणे अन सिध्द होणे यात मोठा फरक- न्यायाधिश शर्वरी जोशी


दक्ष न्यूज प्रतिनिधी : भैय्यासाहेब कटारे

देवळाली कॅम्प : आजच्या तरुण पीढीला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. समाज आणि कायदा यांचे अतूट असे नाते आहे. यासाठी तरुण पीढीने कायद्याचा आभ्यास करावा, गुन्हा दाखल झाला म्हणजे सर्व सोपास्कार पुर्ण झाले असे होत नाही. गुन्हा दाखल होणे अन तो सिध्द होणे यात मोठा फरक असलयाची माहीती न्यायाधिश शर्वरी जोशी यांनी दिली.

श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त महीला सुरक्षा विषयक व अॅटी रॅगिंग कायद्या विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्यायाधिश शर्वरी जोशी बोलत होत्या. व्यासपीठावर न्यायाधिश बी. एम. गिते, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदाम गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, डॉ. स्वाती सिंग आदी होते.

न्यायाधिश शर्वरी जोशी पुढे म्हणाल्या की, स्वयंम सुरक्षा करण्यासाठी पंचसुत्री आवश्यक आहे. यामध्ये जागरुक राहणे, प्रवासा दरम्यान आवश्यक अॅप स्वसुरक्षा प्रशिक्षण स्वताभोवती लक्ष्मणरेषा आखून घ्यायला हवी, तसेच परिस्थिती प्रमाणे निर्णय क्षमता हवी. ही सुत्रे कायम लक्षात ठेवायला हवी. न्यायाधिश बी. एम. गिते यांनी यावेळी सांगीतले की, अॅटी रॅगिंग हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.

रॅगिंग केलयाचे सिध्द झालयास दोन वर्ष कारावस व एक हजार रुपये दंड तसेच पुढील पाच वर्ष कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रेवश मिळत नाही. प्रास्ताविक भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, विद्यार्थ्यानी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना आपलया विषयी काही छेडछाडीचे प्रकार घडत असेल तर याविषयी तातडीने शिक्षकांना माहीती द्यायला हवी, त्यामुळे वेळीच कारवाई करणे शक्य होऊन परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल असे सांगीतले.

याप्रसंगी अॅड. प्रकाश गायकर, अॅड. संजय मुठाळ, अॅड. शामराव हांडगे, अॅड. रामदास आहेर, अॅड. प्रमोद कासार, अॅड. सुनित शितोळे, अॅड. ही माजी आरणे, संजय धमके, सुनिल बागुल, शाम जाधव, सविता आहेर, विजय गायकवाड, एस. डब्लयु पवार, श्वेता श्रीमाळी, जयश्री जाधव आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व द्विपप्रज्वलनाने झाली. सुत्रसंचलन श्रध्दा राराविकर आभार उपपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *