राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई सुरूच; मालेगाव तालुक्यातील गावठी हातभट्टी दारू नष्ट


दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रवीण सूरुडे

मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात गावठी हातभट्टी दारू उच्चाटन मोहिम सुरु असल्याने विभागीय उपआयुक्त नाशिक विभाग तडवी तसेच अधीक्षक शशिकांत गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील खलाणे, गिगाव, झोडगे, बडनेर खा, खाकुर्डी, पाटणे, वाके,वडेल या गावातील गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन, प्लॅस्टिक ड्रम, लोखंड ड्रम, तयार गावठी दारू, चाटू असा दारू बंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त तसेच नाशवंत मुद्देमाल जागेवरच नाश करण्यात आला.

सदर कारवाईत एकूण रु. १,१९,२५०/- किंमतीचा दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल आढळून आला असून, यामध्ये गावठी दारू ३७२ लिटर, रसायन १३७० लिटर जागेवरच नाश करण्यात आले असून, देशी दारू २३ लि. तसेच अवैध मद्य वाहतुक करताना Activa दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाईत एकूण १५ आरोपीत इसमास अटक करुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाख करण्यात आले आहेत. तसेच मालेगाव तालुक्यातील अधिकृत मंजूर ताडी दुकानातून ताडीचे नमुने घेण्यात आले असून, सदरचे नमुने हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था मुंबई येथे रासायनिक विश्लेषण अहवाल कामी पठविण्यात येणार आहेत.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक ०२ चे निरीक्षक देवदत्त पोटे, मालेगावचे निरीक्षक दशरथ जगताप तसेच क्षेत्रीय निरीक्षक सुनील देशमुख, गंगाराम साबळे, सुनिल सहस्त्रबुध्दे, योगेश सावखेडकर किशोर गायकवाड, तसेच दुय्यम निरीक्षक कढभाने, रोहित केरीपाळे तसेच जवान अहिरे, म्हस्के, जाधव, गाडे, पानसरे, देवरे,अस्वले, पगारे, चव्हाण, शिंदे, वाघ, पालवी, कुवर, बोरसे, गांगुर्डे, साळवे यांनी केली.

मालेगाव शहर तसेच ग्रामिण भागातील अवैद्य गावठी, देशी दारू, ताडी विक्री बातची माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव यांचे रावळगाव नाका, मालेगाव येथील कार्यालयात कळविणे बाबत जनतेस आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *