दक्ष ब्रेकिंग न्यूज – सिडको परिसरात युवकाचा खून


दक्ष न्यूज प्रतिनिधी : प्रवीण सूरुडे

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसून पुन्हा अंबड हद्दितच एका युवकाची धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना समोर येत आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक येथे खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोन दुचाकींवर आलेल्या सहा हल्लेखोरानी केली तरुणाची हत्या. पोलीस चौकी समोरच खून झाल्याची माहिती.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप आठवले (२२) असे हत्या केलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने २५ पेक्षा जास्त वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *