ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दोघांना दीड वर्षाचा कारावास


  • अवघ्या काही तासातच उच्च न्यायालयात जामीन मंजूर

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर भडगुजर यांच्यासह इतर दोन जणांना दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदानाचे दिवशी मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक 4 अंबड येथे आरोपी ज्ञानेश्वर बडगुजर, राकेश शिरसाट,सुधाकर बडगुजर, यांनी मतदानाचे दिवशी शस्त्रे बाळगण्यास मनाई असताना कारमधून शस्त्रे ठेवली तसेच पोलिस उपायुक्त राजपूत यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांनी आरोपींना सश्रम कारावास आणि 18,000 रूपये दंडाची शिक्षा ठोठाव
ली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रविन्द्र निकम यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सीएम सुळे व कोर्ट अंमलदार म्हणून जीआर चिखले यांनी आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला. या कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त, सहायक उपायुक्त आणि पोलीस निरीक्षक यांनी अभिनंदन केले आहे. नाशिक वर्तुळात या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

परंतु बडगुजर यांच्या वकिलांनी तत्काळ सर्व सूत्र हलवित उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर लागलीच सुनावणी करीत जामीन मंजूर करून घेतला त्या मुळे बडगुजर यांना दिलासा मिळाला आहे.


One thought on “ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दोघांना दीड वर्षाचा कारावास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *