तलवारीने भररस्त्यात दोघांना भोसकणाऱ्या टोळीला जन्मठेप
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
नाशिक : भांडणाची कूरापत काढून दोघा युवकांना पाच जणांच्या टोळीने राजीवनगर झोपडपट्टीत तलवार, कोयत्याने सपासप वार करून 27 डिसेंबर 2017 रोजी ठार मारले होते. याप्रकरणी अंतिम सुनावणीमध्ये पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शिक्षा झालेल्या पाच आरोपींची रवी निकाळजे, दीपक वाव्हळ, कृष्णा शिंदे, नितीन पंडित आणि आकाश उर्फ बबलू डंबाळे अशी नावे आहेत. त्यांनी दिनेश निळकंठ मिराजदार व देवीदास वसंत इघे यांचा तलवारीने खून केला होता. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, के.बी. चौधरी यांनी तपास करीत सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून अजय मिसर यांनी काम पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस एस गायकवाड व कोर्ट अमलदार महिला पोलीस नाईक एसटी बहिरम यांनी आरोपींना शिक्षा होईपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला.त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले.
Pingback: सातपूर परिसरात बॅटने ठार मारल्याच्या प्रकरणात पित्यासह दोघांना जन्मठेप - live daksh news