सातपूर परिसरात बॅटने ठार मारल्याच्या प्रकरणात पित्यासह दोघांना जन्मठेप


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

नाशिक : फटाके फोडल्याच्या कारणावरून वाद घालत शेजारच्यांनी युवकाच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार करून कार मारल्याची घटना 14 नोव्हेंबर 2020 मध्ये सातपूर येथे घडली होती .या खूनाच्या गुन्ह्यात पित्यासह दोन पुत्रांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही एस कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

आरोपींनी संबळ देव ,रामसिंग यादव या युवकाला ठार मारले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून सचिन गोरवाडकर यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी एस काकड ,पोलीस नाईक वायडी परदेशी, कोर्ट अंमलदार पोलीस हवालदार आर एन शेख यांनी आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला. याबाबत पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


One thought on “सातपूर परिसरात बॅटने ठार मारल्याच्या प्रकरणात पित्यासह दोघांना जन्मठेप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *