कॉपी मुक्त अभियानासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी – डॉ. रावसाहेब शिंदे


दक्ष न्यूज प्रतिनिधी : उमेश कापडणीस

कळवण : फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये होणाऱ्या एच. एस. सी. व एस.एस. सी. परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी आर. के. एम. विद्यालयातील पर्यवेक्षकांची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रावसाहेब शिंदे यांनी उपस्थित सर्व शिक्षक बंधू – भगिनींना आवाहन केले.

शिक्षण पद्धत निकोप व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परीक्षा कॉपी मुक्त होणे ही काळाची गरज आहे. सध्याचा काळ स्पर्धेचा काळ असून त्यात कॉपी करणारे विद्यार्थी तात्पुरती सूज असल्यासारखे कॉपी वर आधारित मिळालेले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी फार काळ स्पर्धेत टिकत नाही परीक्षेत थोडे कमी गुण मिळाले तरी स्वतःच्या मेहनतीवर मिळालेले असावे जेणे करून भविष्यात यशस्वी होण्यास मदत होते असे संस्थेचे संचालक श्री.राजेंद्र भामरे यांनी सांगितले.

बैठकीवेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री. आर. के. महाजन सर, श्री. हेमंत दादा बोरसे, दिप सोनवणे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पी. एम. महाडिक श्री. डी. जे. पवार व सर्व शिक्षक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *