IPL मॅचवर सट्टा लावताय? मग सावधान; तुमच्यावरही होऊ शकते कारवाई..


दक्ष न्युज, प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ओझर दहावा मैल परिसरात आय. पी. एल. मॅचवर स‌ट्टा लावणाऱ्या इसमांवर छापा टाकुन कारवाई केली आहे. दिनांक २४ मे रोजी आय.पी.एल. मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स् या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता. दरम्यान ओझर दहावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती.

त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर, दहावा मैल परिसरात हॉटेल फुडहब मधील रूममध्ये छापा टाकला. सदर ठिकाणी इसम नामे भव्य दवे, नतीन सहा यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाईन पध्दतीने त्यांचे इतर साथीदारांसह वरील आय.पी.एल. सामन्यावर त्यांचे कब्जातील मोबाईलब्दारे लोकांकडुन पैसे लावुन घेवुन बेकायदेशीररित्या स‌ट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले.

फसवणुक केली म्हणून त्यांचेविरूध्द ओझर पोलीस ठाणे गुरनं १०७/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४(अ) व ५, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छाप्यात ताब्यात घेतलेले इसमांचे कब्जातुन विविध कंपन्यांचे ०४ मोबाईल स्मार्टफोन व आय.पी.एल. बेटींगसाठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही, कॅल्क्युलेटर असा २२,१६०/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांचे सात दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहवा किशोर खराटे, मेघराज जाधव, उदय पाठक, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, नितीन डावखर, मनोज सानप यांचे पथकाने सदर कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *