नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ, विभागीय स्तरावरआदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन..


दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक: विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीबाबत काही तक्रारी व शंका असल्यास नागरिकांनी ०२५३- २४६९४१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नायब तहसीलदार (रोहयो) तथा आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी विवेक उपासनी यांनी कळविले आहे.

वरील दूरध्वनी क्रमांकावर नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील नागरीक आपली तक्रार नोंदवू शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *