पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा सत्कार..


करणसिंग बावरी, दक्ष न्यूज

नाशिक: शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत म्हसरूळ पोलीस स्टेशन नाशिक व गंगा माता वाहन शोध संस्था वरदवाडी ता. मावळ जि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रममध्ये नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त नाशिक शहर परिमंडळ २ किरणकुमार चव्हाण तसेच सहायक पोलिस ‌आयुक्त निलेश जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे म्हसरूळ पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयुक्त व उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील परदेशी व विभागीय अध्यक्ष रोहिणी कुमावत, अनिल मोरे आदित्य पवार व इतर महिला पोलिस मित्र टिम हजर होती. कार्यक्रमा ठिकाणी आयुक्तांचा सत्कार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली, त्याबद्दल म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गोपनीय विभागाचे कैलाश कुशारे व सर्व पोलीस स्टेशनचे आभार यावेळी मानण्यात आले.

दरम्यान पोलिसांनी आयोजित केलेल्या या मुद्देमाला वाटपाच्या कार्यक्रमामुळे फिर्यादींना त्यांचे चोरी केलेले साहित्य परत मिळाले असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *