चांदवड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी..
दक्ष न्यूज प्रतिनीधी, आनंद बडोदे
चांदवड: दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त मोठ्या उत्साहात फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल , भाजपा प्रदेश सदस्य अशोक काका व्यवहारे , ज्येष्ठ भाजपा नेते प्रा टी. पी. निकम सर , चांदवडचे पी आय कैलास वाघ , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर,
भाजपा आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी , शहर युवा मोर्चा अध्यक्ष मुकेश आहेर आदींनी प्रतिमा पूजन करत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.