ब्रेकिंग! काँग्रेसने दिला चर्चेला पूर्णविराम; धुळे- मालेगाव व जालना मतदारसंघातून उमेदवार जाहीर..
दक्ष न्यूज, करणसिंग बावरी
महाराष्ट्र: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रसने दोन लोकसभा मतदार संघातील नावे जाहीर केले आहे. त्यात धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री डॅा. शोभा बच्छाव तर जालना लोकसभा मतदार संघातून डॅा. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मतदार संघात अनेक नावांची चर्चा होती.

त्याला पूर्ण विराम देत काँग्रेसने ही उमेदवारी जाहीर केली आहे. डॅा. शोभा बच्छाव या नाशिकच्या माजी महापौर आहे. त्यांचे माहेर हे बागलाणमध्ये तर सासर मालेगावमध्ये आहे. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आल्याची चर्चा आहे. धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दोन विधानसभा मतदार संघ व सटाणा विधानसभा मतदार संघाचा समावेश असल्यामुळे ही उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री डॅा. शोभा बच्छाव तर जालना लोकसभा मतदार संघातून डॅा. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.