भुजबळ फार्म येथे रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरा! पोलीस बंदोबस्तात वाढ..


दक्ष न्युज, करणसिंग बावरी

नाशिक: नाशिकच्या जागेबाबत उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे. नाशिक शहरातून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरातील भुजबळ फॉर्मवर ड्रोन कॅमेरा फिरल्याने रेकीच्या संशयावरून भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास भुजबळ फॉर्मवर ड्रोन कॅमेरा फिरल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेले भुजबळ फार्म येथे रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरा दिसला. ड्रोन कॅमेराच्या साह्याने रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी पोलीस उपयुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट दिली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून भुजबळ फार्मवर रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेरा फिरल्याने रेकीचा संशय व्यक्त केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *