छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊ नका! गायकर यांचा भुजबळांच्या उमेदवारीला विरोध…


दक्ष न्युज, करणसिंग बावरी

नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महायुतीमध्ये जागेचा तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून करंजकरांना डावलून वाजेंना तिकीट मिळाल्याने करंजकर नाराज होते. तर दुसरीकडे आता विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट करून नाशिकची महायुतीची उमेदवारी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांना मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. याच पार्शवभूमीवर नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी भुजबळांना उमेदवारी देऊ नका असं म्हणत भुजबळांवर घणाघाती टीका केली आहे.

  • काय म्हणाले छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर?

‘महायुतीला ओबीसी चा उमेदवार द्यायचा असेल तर तुम्ही देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांना उमेदवारी द्या परंतु छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना उमेदवारी दिल्यास लोकसभेत त्यांना आम्ही पराभूत करू’ अस यावेळी गायकर म्हणाले.

दरम्यान नाशिक मधून बहुतेक ठिकाणांहून मंत्री छगन भुजबळ यांना विरोध पाहायला मिळतोय. त्यामुळे आता नाशिकची जागा भुजबळांना मिळणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *