धान्य वितरण अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक…


दक्ष न्युज प्रतिनिधी, संतोष विधाते

नाशिक: सद्या लाचेची प्रमाण चांगलेच वाढले आहे. यातच आता एका धान्य वितरण अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. २२ हजार रुपयांची लाच घेतांना धान्य वितरण नामे रवींद्र बळीराम दहीते यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते सामाजिक कार्य ही करतात. तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील 15 गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्ड ची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत.

तक्रारदार हे दिनांक ४ एप्रिल रोजी मालेगाव येथील रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्यासंदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे १५ हजार रुपये असे एकूण १५ कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण २२ हजार ५०० रुपयाची पांचासमक्ष मागणी केली. यानंतर त्यांना २२ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

सदरची कामगिरी अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अनिल बडगुजर,सापळा पथक पोलीस नाईक दिपक पवार, पोलीस शिपाई संजय ठाकरे यांच्यासह पथकाने केली आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *