माणुसकीचे दर्शन! जागृत नागरिकांमुळे पक्षास जीवनदान..
दक्ष न्युज प्रतिनिधी, भावेश बागुल
नाशिक: माणसाने माणसाशी माणसासम वागणे हि प्राथर्ना तर आपली ऐकलीच असेल मात्र नाशिकच्या नांदूर गावातुन माणसाने पक्षांशी माणसासम वागणे याचा प्रत्यय आला आहे. त्याच झालं असं कि, नांदूर गाव येथे एका उंच झाडावर नायलॉन मांजाला एक कावळा अडकल्याच रस्त्यावरून जाणाऱ्या शंकर निमसे यांच्या लक्षात आले.

त्यांनी लगेच घणकचरा व्यवस्थपणचे मुकादम बाळासाहेब जगताप यांना कळवले असता त्यांनी अग्निशमक दलाला या घटनेची माहिती दिली. काही वेळात अग्निशमक दलाचे कर्मचारी सदर ठिकाणी उपस्थित झाले. झाडाची उंची मोठी असल्या कारणाने अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्राम करून त्या पक्षाची सुटका केली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी नाना पाटील (लिडींग फायरमन ), यू. जी गाटे (फायरमन ), वाहन चालक फटांगळे, फायरमन हरीश जाधव, घनकचरा विभागाचे मुकादम बाळासाहेब जगताप, घरपट्टी विभागाचे संजय दिंडे, शंकर निमसे,शरद मते आदींनी पक्षची सुटका करण्यास प्रयंत्न केले.