बैलगाडा प्रेमी पंढरी शेठ फडके यांचे निधन; जाणून घ्या कोण होते पंढरी शेठ फडके..


दक्ष न्युज प्रतिनिधी, भावेश बागुल

महाराष्ट्र: महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले आहे. बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे पनवेल येथे निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऑफिस वरून घरी जात असताना कार मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • कोण होते पंढरी शेठ फडके?

मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’ मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. दरम्यान पंढरीशेठ फडके यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथे शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *