दिल्लीच्या आंदोलनाला चांदवडच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा; चांदवड मुंबई- आग्रा महामार्ग चौफुली जवळ शेतकऱ्यांचे आंदोलन..
आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी..
दक्ष न्युज प्रतिनिधी, आनंद बडोदे
चांदवड: दिल्लीकडे रवाना झालेल्या शेतकरी आंदोलन २.० च्या मोर्चास पाठींबा देण्यासाठी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी रस्त्यावर येत आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांचा विरोध केला. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भिमराव जेजुरे, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष समाधान जामदार, डॉ. राजेंद्र दवंडे, डॉ. शामराव जाधव, बाळासाहेब शिंदे, संपतराव वक्ते, दिलीपराव पाटील, दत्तात्रय गांगुर्डे, भागवत झाल्टे, सुखदेव केदारे खेमराज कोर, हनुमंत गुंजाळ, दिलीप वाघ आण्णा जिरे, रंगनाथ जिरे, बाबासाहेब पवार आदींसह शेतकरी बांधव संख्येने उपस्थित होते.