जिल्हा व तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रांत कैलास कडलग यांचा यथोचित सत्कार..


आनंद बडोदे, दक्ष न्युज प्रतिनिधी

चांदवड: चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचा चांदवड तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक संलग्न चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ,चांदवड उपविभागीय अधिकारीपदी कैलास कडलग यांची नियुक्ती झाल्याने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा व तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार, चांदवड तालुका अध्यक्ष भरत मेचकुल,सरचिटणीस कैलास सोनवणे, विजय काळे, महेश गुजराती, महेंद्र गुजराती, सोमनाथ जाधव, कैलास सोनवणे, धनंजय पाटील,समाधान पगारे,सचिन हिरे, पिंटू राऊत आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *