मालेगावातील मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश! चोरीच्या १३ मोटर सायकल जप्त..


नाशिक ग्रामीण पोलीसांची मालेगावात धडक कारवाई..

भावेश बागुल, दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक: शहरात तसेच ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह जवळच्या तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले होते. या पार्शवभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील नाउघड मोटर सायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे.

त्याअनुषंगाने पोलीस पथकाने आयुबी चौक परिसरात सापळा रचून संशयीत नामे ईकलाख अहमद यास ताब्यात घेतले. त्याच्या कडील हिरो स्प्लेंडर मोटर सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार जहिर अहमद अब्दुल यांनी संगमताने सदरची मोटर सायकल मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण १३ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, संतोष हजारे, सुनिल पाडवी, पोना देवा गोविंद, पोकों गिरीष बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्यासह पथकाने केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *