देवळा तालुका पिंपळगाव येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण..
आदिती ठाकूर, दक्ष न्युज प्रतिनिधी
देवळा: सकल मराठा समाजाच्या वतीने सकल मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मराठी हद्ययसम्राट मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून पिंपळगाव येथे घोषणा बाजी करून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.
उपोषण स्थळी उपोषणकर्ते देवळा तालुकाध्यक्ष आकाश थोरात, संजय दहिवडकर, मनसेचे सेना देवळा तालुकाध्यक्ष हरी भाऊ चव्हाण, पिंपळगावचे उपसरपंच थोरात, मेशीचे आप्पा कुलकर्णी, गणेश लिंगायत, ज्ञानेश्वर निकम जितेंद्र बच्छाव, किरण पाटील, अमोल शेवाळे, दहिवडचे जालिंदर मोरे आदिंसह पिंपळगाव गावातील सर्व धर्म समभाव नागरिक उपोषणात सहभागी होते.
दरम्यान देवळा पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक दिपक पाटील गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी बच्छाव यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण कर्त्यांनी लाक्षणिक उपोषण मागे घेतले.