अवकाळीचा फटका! नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून भरपाई द्या.. अन्यथा आंदोलनाचा इशारा..


दक्ष न्यूज प्रतिनीधी, परमेश्वर आंधळे

नाशिकः अवकाळीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्या गेला आहे. याचा सर्वात मोठा फटका नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आल आहे. नाशिक ,धुळे ,नंदुरबार ,जळगाव भागातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून भरभक्कम भरपाई द्या तसेच पिक विमा कंपन्यांचे निकष बदलून शेतकऱ्यांना न्याय द्या या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे देण्यात आले आहे.

दरम्यान शेतमालाला भाव नसल्याने आधीच हवालदिल झालेला शेतकरी या अवकाळी मुळे मात्र उध्वस्त झाला आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा ,कापूस ,मका, टोमॅटो, ऊस ,द्राक्ष यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने करून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,कृषी मंत्र्यांनी व प्रशासनाने एकूण परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तातडीने पारित करावेत अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे . अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *