३४ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत पोलीस आयुक्तालयाच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी..


दक्ष न्यूज प्रतिनीधी, भावेश बागुल

नाशिकः जळगाव येथे नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या ३४ व्या नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये आयुक्तालयाचे १४० पुरुष व ४० महिला पोलीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

यात पुरुष सांघिक प्रकारात तीन सुवर्ण, ३४ रौप्य व ११ कांस्यपदक पटकावले आहे. तर महिला खेळाडूंनी सांघिक प्रकारात १ सुवर्ण,१ रौप्य तर वैयक्तिक प्रकारात १५ सुवर्ण १७ रौप्य तर ८ कास्यपदक पटकावले आहे.

या विजेत्या खेळाडूंचे नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पदक पटकावलेल्या खेळाडूंचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपयुक्त प्रशांत बच्छाव ,किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत ,चंद्रकांत खांडवी यांनी अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *