मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये भाजपाची सत्ता तर तेलंगणा राज्यात काँग्रेस विजयी..
दक्ष न्युज : करणसिंग बावरी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारी नुसार भाजपला तीन राज्यात आपली एकहाती सत्ता प्राप्त करण्यात यश आले आहे. लोकसभा निवडणूक अगोदर तीन राज्यात कमळ फुलल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. BJP is in power in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh while Congress is victorious in Telangana.

मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यात भाजपला यश आलं आहे. चार राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेसला जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी तेलंगणा राज्यात मात्र काँगेसने मोठा विजय मिळवला आहे. मात्र मध्यप्रदेश, राजस्थान , छत्तीसगड या राज्यांमध्ये कमळ फुलल्याने मोदी लाट कायम असणार असल्याचे बोलले जात आहे.In assembly elections

- असा आहे निकाल..
छत्तीसगड – ९०
भाजप – ५४
काँग्रेस – ३६
इतर – ०
मध्यप्रदेश – २३०
भाजप – १६४
काँग्रेस – ६५
इतर – १
राजस्थान – १९९
भाजप – ११५
काँग्रेस – ६९
इतर – १३
तेलंगणा – ११९
भाजप – ८
काँग्रेस – ६४
बिआरएस – ३९
एमआयएम – ७