महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी हिंगमिरे
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे नाशिक जिल्हा समितीची शनिवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील वीरशैव लिंगायत समाज कार्यालय मालेगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा २०२३ मध्ये बिनविरोध महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी मान्यवर म.वी सभा प्रांतिक अध्यक्ष प्राध्यापक रमेश आवटे, वसंतराव नगरकर म.वी सभा माजी प्रांतिक अध्यक्ष, जगदीश घोडके म.वी सभा प्रांतिक उपाध्यक्ष, अनिल पठाडे म.वी सभा नाशिक जिल्हाध्यक्ष, डॉ.संदेश हिंगमिरे कार्याध्यक्ष म.वी सभा नाशिक, अंबादास आंधळकर प्रांतिक सदस्य व नाशिक जिल्ह्यातील समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.