स्थानिक आर. टी. ओ. कार्यालयातून बंद पडलेल्या स्मार्ट कार्ड्स ची छपाई तात्काळ सुरु करा – मनसे


दक्ष न्यूज प्रतिनिधी : परमेश्वर आंधळे

नाशिक : राज्य शासनाने प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये सन २००६ पासून सुरु केलेल्या स्मार्ट कार्ड छपाईस शासनानेच एकाएकी बंद केली असून आता राज्यात फक्त मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजी नगर ह्या तीन केंद्रांवरच सुरु ठेवण्यात आली आहे.

शासनाच्या ह्या अनाकलनीय आदेशामुळे आधीच वाहनांच्या नोंदणी कार्ड (आर.सी.बुक) व वाहन चालकांच्या अनुज्ञप्ती (लायसन्स) आपल्या संथ कामांमुळे व संशयास्पद खाबुगिरी व तथाकथित दलालांच्या सुळसुळाटामुळे कायमच वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या एकूणच कामगिरीवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला असून आधी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दररोज सुमारे १२०० वाहन चालकांना परवाने देण्यात येत होते, मात्र स्मार्ट कार्डच्या ह्या कृत्रिम तुटवड्यामुळे एकट्या नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातच गत दोन महिन्यांपासून तब्बल चार हजाराहून जास्त प्रकरणे प्रलंबित असल्याचे समजते.

शासनाच्या ह्या तुघलकी निर्णयामुळे स्मार्ट कार्डच्या पुरवठ्यात विस्कळीतपणा आला असून उपरोक्त तीन कार्यालयांमधून छपाई होऊन येत असलेले स्मार्ट कार्ड्स आधी टपाल खाते व त्यापुढे प्रादेशिक परिवहन खात्यांतील त्यासंबंधीच्या प्रक्रियेमुळे प्रलंबित होऊन अडचणीचे झाले आहे. त्यातच ह्या अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांत एखादी शुल्लक चूक असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी छपाई होणाऱ्या केंद्रांवरच जावे लागणार असून हे परवाने नेमके कुठल्या केंद्रांवर छापले गेले हेही समजत नसल्याने वाहन धारकांसाठी मोठी डोके दुखी झाली आहे.

जनतेच्या भावनेची दखल घेऊन वाहनांच्या नोंदणी कार्ड (आर सी बुक) व वाहन चालकांच्या अनुज्ञप्ती (लायसन्स) च्या स्मार्ट कार्ड छपाईस तात्काळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये सुरुवात करून सर्वसामान्य नागरिकांची सुरु असलेली परवड थांबवावी अन्यथा या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची असा इशारा मनसे ने दिला आहे.


या वेळेस निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके,रस्ते अ जिल्हा संघटक तथा अध्यक्ष अमित गांगुर्डे,रस्ते अ महानगर संगटक तथा अध्यक्ष विजय अहिरे,जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष प्रफुल बनबेरु,शहर सरचीटनीस निखील सरपोतदार,शहर चीटनीस कीरण शिरसागर,शहर संघटक संजय देवरे,जनहीत जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ जाधव उपस्थीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *