व्रत वैकल्यांच्या “श्रावण” मास


दक्ष न्यूज: अमित कबाडे

नाशिक– व्रत वैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या श्रावणाला उद्यापासून सुरवात होत असून, शहरातील शिवमंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. अधिक महिना असल्याने ८ श्रावणी सोमवार आले आहेत. मात्र १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत निज श्रावण मास असल्याने याच महिन्यातील चार श्रावणी सोमवारचे उपवास करण्याचे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे.


मराठी महिन्यात दर तीन वर्षांनी कोणता तरी महिना अधिकमासात येतो. त्यात सामान्यतः २७ ते ३५ महिन्यात अधिक मास येतो. त्याचप्रमाणे दर १९ महिन्यांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो. अधिक मासात मंगळवारपासून उत्साहात श्रावण सुरु होत असल्याने नागरिकांमध्ये अपूर्व उत्साह बघायला मिळतो. या निमित्ताने शिवमंदिरात गजबज उद्यापासून वाढेल. पूजा साहित्य विक्री मोठ्या प्रमाणावर होईल. या काळात मांसाहार वर्ज्य करून शाकाहाराला प्राधान्य दिले जाते.


नाशिक जवळ असलेल्या बारा ज्योतिर्लिंगीपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वरला तिसऱ्या श्रावण सोमवारी फेरी मारण्याची परंपरा रूढ झाली आहे. तरुणाई मोठ्या उत्साहात यात सहभागी होत असते. प्रशासनाच्यावतीने खास बससेवा उपलब्ध करून दिलेली असते. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या त्रंबकेश्वरला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील भाविक येत असल्याने शहराच्या अर्थकारणाला गती मिळते.

  • पहिला श्रावण सोमवार २१ ऑगस्टला

अधिक महिना असल्याने पहिला श्रावण सोमवार २१ ऑगस्टला असून, दुसरा सोमवार २८ ऑगस्टला, ४ सप्टेंबरला तिसरा तर ११ सप्टेंबरला चौथा श्रावण आहे. अर्थात अधिक मास वगळता हे खरे श्रावण सोमवार असल्याचे पंचांगकर्त्यानी म्हटलेय.

  • शास्त्र काय म्हणते?

यापूर्वी २००४ मध्ये अधिक श्रावण मास आला होता. यावर्षी श्रावण अधिक मास असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार व्रते निज मासात म्हणजेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०१३ या कालावधीत करण्याचे पंचांगकर्त्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *